Pages

Pages

Saturday, February 26, 2011

Radhe_Krishna.....

रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा!..गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!

Thursday, February 10, 2011

life drawing

Photoshop 40 min....... Hi, I started a My life Drawing blag here,So feel free to comment, critique, trash me, etc etc, any feedback is helpful.

Wednesday, February 09, 2011

सेल्फ पोट्रेट

दिसणं संपत तिथ असणं सुरू होत,असणं संपत तिथ नसणं सुरू होत, जे नाहीच आहे त्या बधल बोलण्यात काय अर्थ आहे ..आणि जे आहे ते इतके ठसठशीत आहे कि ते सांगण्यास शब्द अपुरेच आहेत ,म्हणून जे आहे ते सांगण्यासाठी मानवाला कलेची गरज पडली असावी ,अशा ठसठशीत सत्या साठी कलाकाराने राग गायले असावेत ,चित्र रेखाटली असावीत ,रंग भरले असावेत ,शिल्प बनवली असावीत ,नाच हि असाच जन्माला आला असावा ,ती प्रत्येक गोष्ट जी मनाला मोहते तिची निर्मिती हि अशाच अज्ञात सत्याने जन्माला घातली असावी . किती सोपं होत निसर्गाबरोबर लहानाचे मोठे होणे ..पण आपण आपल्या दृष्टीला भिंती घालून घर बनवण्याचा प्रयत्न केला ...या विराट नैसर्गिक मनाला चार भिंती थोपू शकतात असा विचार केला ,सत्याशी तोडून स्वताला एक ना अनेक नात्यांनी ,कारणांनी ,गरजांनी आपण स्वताला कोंडून घेण्याचा प्रयत्न केला ,कुणा पासून पळण्याचा हा प्रयत्न? ,असण्यापासून कि नसण्यापासून ? कलावंत नेहमी प्रयत्न करत राहिला सगळ्यांना सत्याचा चेहरा दाखवण्याचा ..पण दैवदुर्विलास नसण्याच्या प्रेमात पडलेली ही नजर असण्याला भुलणार कशी ? मग सुरु झाला वैश्विक रोमांटिक प्रेम सोहळा ....ज्याचा साठी तुडवला गेला अंगणात पडलेला चाफा ,सोनेरी किरणांच्या पहाटे ऐवजी अंगात भरू लागल्या रात्रीचा डिस्को लेझर ,कस अस विसकटल गेलं रान आपल्याच युगात ? म्हणूनच फिस्कटायला लागले असावेत रंग माझ्या कॅनवास वर पण लोकांना ते ही आवडले ....... जेंव्हा सत्य मांडले लोकांसमोर तेंव्हा त्याचा तमाशा झाला आणि तमाशा केला तेंव्हा लोक ओ हो ! ओ हो ! म्हणाले ..... हाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहा हाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहा