Pages
▼
Pages
▼
Monday, December 05, 2011
Tuesday, November 29, 2011
Tuesday, October 25, 2011
Friday, October 21, 2011
Sunday, August 07, 2011
Saturday, May 21, 2011
Thursday, May 19, 2011
सेल्फ पोट्रेट 4
मी नेहमीच रंगवायचो न पाहिलेल्या स्वप्नांच चित्र ...
खेळलो खेळ कधी न उमजणारे. चाललो अधांतर रस्त्यांवारुनी पण नेहमी मधोमध न इकडे न तिकडे ,पावसाने ओले चिंब झालेले शर्ट न कधी उतरवून ठेवलं ,नाही कधी चिटकू दिल. इतकं अलिप्त जगलो कि ना मी आल्याने कुणी दुखावलं ना जाण्याने , कराव्या वाटल्या जेंव्हा कविता कविता सुचल्या , आणि जेंव्हा वाटल की सोडवा मोह त्या पोरीचा तेंव्हा मोह सुटला . पुस्तक खाऊन थुंकलो एकदा चुकून एका कागदावर तर त्याच सुधा चित्र झालं. आणि जेंव्हा काढली चित्र पैसे घेऊन इतरांसाठी तेंव्हा ती थूंकलेली थुंक जास्त चांगली वाटली . राग नव्हता कधी ,कधीच .....कशावर ही, अनुराग सुधा नाहीच. निर्णय घेण्याचे क्षण आले नाहीत असे नाही पण ते घेण्या आधीच निर्णय लागून मोकळे झाले ...या आणि अश्या अनेक गोष्टी माझ्या नकळत होत राहिल्या, मी त्यांना पहात राहिलो त्या मला पाहत राहिल्या .
यात एकाच प्रश्न मला पडला.
हि नियती नावाची स्त्रीप्रधान गोष्ट आहे तरी काय ?
सेल्फ पोट्रेट 3
" आकारांचा अर्थ शोधताना,छटांचा मागोवा घेताना,रंगांना स्पर्श करतांना..नेहमी अस होत...की ते हातांना लागणारच असतं आणि नेमकी ती वेळ निघून जाते , परिपूर्ण होणारा शोध नेमका अपूर्ण राहतो , आणि ती वेळ अमर करून जातो ,म्हणजे बघाना ,हवी हवीशी वाटणारी ती ,साक्षात एक दिवस अचानक तुमच्या समोर येते ,हाच तो क्षण... हीच ती वेळ ..... हे हि पटलेले असतं आणि पोटातल्या शब्दांचा नेमका त्या क्षणी गोळा होतो, जो वर ही येत नाही आणि खाली ही जात नाही. वेळे सारखा अडकून राहतो ,आणि ती हातातून निघून जाते ....ती वेळ मात्र अमर होऊन जाते......अपूर्णातच अमरत्व आहे ...."
Saturday, April 30, 2011
Saturday, April 02, 2011
Raima Sen
She is the daughter of Moon Moon Sen and the granddaughter of legendary actress Suchitra Sen. Her sister, Riya Sen, is also in the Bollywood industry. Their father Bharat Dev Varma is a member of the royal family of Tripura.
Thursday, March 31, 2011
Saturday, February 26, 2011
Wednesday, February 23, 2011
Wednesday, February 16, 2011
Thursday, February 10, 2011
life drawing
Photoshop 40 min.......
Hi,
I started a My life Drawing blag here,So feel free to comment, critique, trash me, etc etc, any feedback is helpful.
Wednesday, February 09, 2011
सेल्फ पोट्रेट
दिसणं संपत तिथ असणं सुरू होत,असणं संपत तिथ नसणं सुरू होत, जे नाहीच आहे त्या बधल बोलण्यात काय अर्थ आहे ..आणि जे आहे ते इतके ठसठशीत आहे कि ते सांगण्यास शब्द अपुरेच आहेत ,म्हणून जे आहे ते सांगण्यासाठी मानवाला कलेची गरज पडली असावी ,अशा ठसठशीत सत्या साठी कलाकाराने राग गायले असावेत ,चित्र रेखाटली असावीत ,रंग भरले असावेत ,शिल्प बनवली असावीत ,नाच हि असाच जन्माला आला असावा ,ती प्रत्येक गोष्ट जी मनाला मोहते तिची निर्मिती हि अशाच अज्ञात सत्याने जन्माला घातली असावी .
किती सोपं होत निसर्गाबरोबर लहानाचे मोठे होणे ..पण आपण आपल्या दृष्टीला भिंती घालून घर बनवण्याचा प्रयत्न केला ...या विराट नैसर्गिक मनाला चार भिंती थोपू शकतात असा विचार केला ,सत्याशी तोडून स्वताला एक ना अनेक नात्यांनी ,कारणांनी ,गरजांनी आपण स्वताला कोंडून घेण्याचा प्रयत्न केला ,कुणा पासून पळण्याचा हा प्रयत्न? ,असण्यापासून कि नसण्यापासून ? कलावंत नेहमी प्रयत्न करत राहिला सगळ्यांना सत्याचा चेहरा दाखवण्याचा ..पण दैवदुर्विलास नसण्याच्या प्रेमात पडलेली ही नजर असण्याला भुलणार कशी ? मग सुरु झाला वैश्विक रोमांटिक प्रेम सोहळा ....ज्याचा साठी तुडवला गेला अंगणात पडलेला चाफा ,सोनेरी किरणांच्या पहाटे ऐवजी अंगात भरू लागल्या रात्रीचा डिस्को लेझर ,कस अस विसकटल गेलं रान आपल्याच युगात ?
म्हणूनच फिस्कटायला लागले असावेत रंग माझ्या कॅनवास वर
पण लोकांना ते ही आवडले .......
जेंव्हा सत्य मांडले लोकांसमोर तेंव्हा त्याचा तमाशा झाला
आणि तमाशा केला तेंव्हा लोक ओ हो ! ओ हो ! म्हणाले .....
हाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहा
हाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहा















