Pages

Pages

Thursday, July 11, 2013

No Smoking ...

खूप भूक लागली तेंव्हा कागदं खाल्ली,
तहांनेणे जेंव्हा व्याकुळलो तेंव्हा रंग पियालो.
मोकळा श्वास जेंव्हा घेतला, फुफुसं भरली आकारांनी.
स्पेस हवाहोता तेंव्हा, तेंव्हा कुंपण घातली नियतीनी.
आणि स्पेस मिळाला तेंव्हा, तेंव्हा कुंपणच आपली वाटली.
to be or not to be च्या प्रश्नांत रोज ट्रेन पकडली,
गुलझार च्या कविता ऎकत ऎकत झोप ओढली.
खूप भूक लागली आता तरी कागद नाही खाता येत
रंग पियाला मी काय येडाय,
फुफुसात अटकलेत आकार, डॉक्टर समझतायत दमा हाय,
माणूस म्हणून जन्माला आलोय तरी,चित्रकार म्हणून वावरणं अंगाशी आलाय आता.
लवकरच यावर तोडगा शोधला पाहिजे,
कागदांची भूक, रंगांची तहान, आकारांची ओढ, स्पेसची जाणीव…
या सगळ्यांना वास्तवाच्या आगीत जाळलं पहिजे.
बरंच काम बाकी आहे…
पुन्हा तलब येण्याच्या आधी एक शेवटची सिगरेट पेटवली पाहिजे …

नो स्मोकिंग…


११/७/२०१३

No comments:

Post a Comment