सेल्फ पोट्रेट 4

मी नेहमीच रंगवायचो न पाहिलेल्या स्वप्नांच चित्र ... खेळलो खेळ कधी न उमजणारे. चाललो अधांतर रस्त्यांवारुनी पण नेहमी मधोमध न इकडे न तिकडे ,पावसाने ओले चिंब झालेले शर्ट न कधी उतरवून ठेवलं ,नाही कधी चिटकू दिल. इतकं अलिप्त जगलो कि ना मी आल्याने कुणी दुखावलं ना जाण्याने , कराव्या वाटल्या जेंव्हा कविता कविता सुचल्या , आणि जेंव्हा वाटल की सोडवा मोह त्या पोरीचा तेंव्हा मोह सुटला . पुस्तक खाऊन थुंकलो एकदा चुकून एका कागदावर तर त्याच सुधा चित्र झालं. आणि जेंव्हा काढली चित्र पैसे घेऊन इतरांसाठी तेंव्हा ती थूंकलेली थुंक जास्त चांगली वाटली . राग नव्हता कधी ,कधीच .....कशावर ही, अनुराग सुधा नाहीच. निर्णय घेण्याचे क्षण आले नाहीत असे नाही पण ते घेण्या आधीच निर्णय लागून मोकळे झाले ...या आणि अश्या अनेक गोष्टी माझ्या नकळत होत राहिल्या, मी त्यांना पहात राहिलो त्या मला पाहत राहिल्या . यात एकाच प्रश्न मला पडला. हि नियती नावाची स्त्रीप्रधान गोष्ट आहे तरी काय ?

0 comments:

Copyright © 2014 Rupesh Talaskar. Powered by Blogger.

Popular Posts

 

Pages